जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचा वाद आता थेट मंत्रालयामध्ये पोहोचला आहे.
उद्या मंदिरातील वादाबाबत मुंबईत मंत्रालयात एक बैठक होणार आहे.
अंबाबाई देवस्थानसाठी स्वतंत्र अधिनियम करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यात यापुर्वीच पंढरपूर, शिर्डी, आणि सिद्धीविनायकसाठी स्वतंत्र अधिनियम आहे. सध्या कोल्हापूरमध्ये अंबाबाई भक्त मंडळानं पुजारी हटाव मोहिम सुरु केली आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पगारी पुजारी नेमण्याबाबत एक समिती नेमली.
या समितीने यापुर्वीच 2 हजार 500 पानांची कागदपत्र प्रशासनाकडं दिली आहेत. राज्याच्या महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात उद्या दुपारी 12 वाजता ही
बैठक होणार आहे. त्यामुळं आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडं देवीच्या भक्तांसह कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिले आहे.