जय महाराष्ट्र न्यूज, आरमोरी
आमदार कृष्णा गजबेंच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली.
भास्कर चौके असं या अंगरक्षकाचं नाव आहे. वडसा येथील आमदाराच्या संपर्क कार्यालयाबाहेर भास्करनं स्वत:जवळील सर्व्हिस रायफलमधून डोक्यात गोळी झाडली.
अतिरक्तस्त्रावमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.