Nagpur Accident : गाडीचे चाक प्रणयच्या डोक्यावरून गेले अन्…; वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतणाऱ्या 24 वर्षीय प्रणय दिलीप बडगे याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापती चौक उड्डाणपुलावर घटना घडल्याची माहिती आहे.

Nagpur Accident : गाडीचे चाक प्रणयच्या डोक्यावरून गेले अन्…; वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

नागपुरात एक भीषण अपघात घडला आहे. वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतणाऱ्या 24 वर्षीय प्रणय दिलीप बडगे याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापती चौक उड्डाणपुलावर घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रजापती चौकातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी भरधाव वेगाने जात असलेल्या कचरागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली.

हेही वाचा- Badlapur Crime: 'हवे तेवढे पैसे आणि मुलगी घेऊन जा…' नवऱ्याची बायकोला धक्कादायक ऑफर, पण शेवटी जे घडलं…

प्रणय दिलीप बडगे आणि त्याचा मित्र आर्य धर्मेश राठोड हे दोघेही कुही फाटा येथे एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला होता. दोघेही कुही येथील वाढदिवसाच्या पार्टीहून नागपुरात परतत होते. त्यावेळेस कचरा संकलन करणाऱ्या गाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिल्याने प्रणय व त्याचा मित्र आर्य धर्मेश राठोड मोडेपवरून खाली पडले. त्यानंतर गाडीचे चाक प्रणयच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या धडकेमुळे गंभीर दुखापत झालेल्या आर्य राठोड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी प्रणय याचे वडील दिलीप ताराचंद बडगे (52) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी फरार कचरागाडी चालक मनोज उईकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच मृत प्रणयचे वडील शिक्षक असून, या घटनेने बडगे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number