Khopoli News : दुर्दैवी घटना! खोपोलीतील धबधब्यावर तरुणाचा पाय घसरला; दरीत पडून 23 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

खोपोली : खोपोली येथील प्रसिद्ध केपी (KP) धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या चार युवा पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर सोमवार, 3 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्र केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आले होते. डीपी धबधबा येथे ते वर्षा सहलीचा आनंद लुटत होते. पाण्याचा […]

Khopoli News : दुर्दैवी घटना! खोपोलीतील धबधब्यावर तरुणाचा पाय घसरला; दरीत पडून 23 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

खोपोली : खोपोली येथील प्रसिद्ध केपी (KP) धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या चार युवा पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर सोमवार, 3 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्र केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आले होते. डीपी धबधबा येथे ते वर्षा सहलीचा आनंद लुटत होते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यावेळी अभिषेक कुसवाहा (वय 23) हा पाण्यात पडून बेपत्ता झाला. सायंकाळी सातच्या सुमारास त्याच्या मित्रांनी झेनिथ ठाकूरवाडी येथे येऊन स्थानिकांना घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : गरम भाजीत पडून दोन वर्षांची चिमुकली होरपळली, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली; परिसरात हळहळ

याबाबत खोपोली पोलिसांना माहिती मिळताच हेल्प फाउंडेशचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री सुमारे एक वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते. अखेर सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अभिषेक कुसवाहा याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेत साहील हरिजन (वय 17), देवा गायधनकर (वय 22) आणि साहील (वय 19) हे इतर तीन मित्र सुरक्षित असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number