Nandurbar Crime : मोबाईलमध्ये 200 हून अधिक व्हिडिओ, 5 वर्षांपासून शोषण आणि…, नंदुरबारमधून धक्कादायक प्रकार समोर

कथित ध्वनीफित प्रकरणांनंतर आता नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nandurbar Crime : मोबाईलमध्ये 200 हून अधिक व्हिडिओ, 5 वर्षांपासून शोषण आणि…, नंदुरबारमधून धक्कादायक प्रकार समोर

कथित ध्वनीफित प्रकरणांनंतर आता नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन बालकांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवणाऱ्या 22 वर्षीय संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने 2022 पासून 6 ऑगस्ट 2026 पर्यंत अनेक बालकांचे शोषण केले आणि त्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले की, संशयित आरोपीच्या मोबाईलमध्ये तब्बल 200 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ होते. या व्हिडिओचा गैरफायदा घेऊन हा आरोपी अल्पवयीन मुलांवर आणि तरुणांवर लैंगिक अत्याचार करत होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- Cyber Fraud:फेसबुकवरील मैत्री पडली महागात! शेतकऱ्याची 6.31 लाखांची फसवणूक; निघालं आफ्रिकन कनेक्शन

तसेच आरोपीचा मोबाईल हाती लागताच फॉरेन्सिक पथकाकडून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो आणि बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख या प्रकरणी अधिक तपास करत असून पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी अटकेत
कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात चर्चेत असलेले भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक स्वरूपाची विधाने केल्याचा आरोप करत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये विजय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही अशाच स्वरूपाची स्वतंत्र तक्रार दाखल केली होती. यादरम्यान आठ दिवसांपासून फरार असलेल्या चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेऊन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number