मोठी बातमी! राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटले; अजित पवार गटात अंतर्गत वाद? की नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटातील काही […]

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटले; अजित पवार गटात अंतर्गत वाद? की नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटातील काही आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही आमदार पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशा, आगामी निवडणुकीची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील बदलत्या समीकरणांबाबत साशंक असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याची चर्चा आहे. या घडामोडींना आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे ते म्हणजे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे. पक्षातील वाढती अस्वस्थता आणि आमदारांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व दिलं जात आहे.

हेही वाचा : NCP Sharad Pawars Meeting : एकदाचं ठरलं! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पवारांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number