युक्रेनमधून २१९ विद्यार्थी पोलंडवरून भारतात

रशिया-युक्रेनमद्ये गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, युक्रेनमधून २१९ विद्यार्थी पोलंडवरून भारतात आले असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी महाराष्ट्रातून कोण आले आहे, असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले. रशिया-युक्रेन युद्धामध्ये अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. […]

युक्रेनमधून २१९ विद्यार्थी पोलंडवरून भारतात

रशिया-युक्रेनमद्ये गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, युक्रेनमधून २१९ विद्यार्थी पोलंडवरून भारतात आले असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी महाराष्ट्रातून कोण आले आहे, असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.

रशिया-युक्रेन युद्धामध्ये अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. ऑपरेशन गंगाद्वारे अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी परत आणण्यात  आले आहे.

आतापर्यंत किती भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले?

२६ फेब्रुवारी : रोमानियाहून २१९ भारतीयांना घेऊन पाहिले विमान मुंबईत पोहोचले.


२७ फेब्रुवारी : दुसरे विमान २५० भारतीयांना घेऊन नवी दिल्लीत पोहोचले.


२७ फेब्रुवारी : २४० भारतीयांना घेऊन तिसरं विमान बुडापेस्टहून नवी दिल्लीत पोहोचले.


२७ फेब्रुवारी : बुखारेस्टहून १९८ भारतीयांना घेऊन चौथं विमान नवी दिल्लीत पोहोचले.


२८ फेब्रुवारी : बुखारेस्टहून २४९ भारतीयांना घेऊन पाचवं विमान नवी दिल्लीत पोहोेचले.


२८ फेब्रुवारी : बुडापेस्टहून २४० भारतीयांना घेऊन सहावं विमान नवी दिल्लीत पोहोचले.


१ मार्च : सातवे विमान १८२ भारतीयांना घेऊन बुखारेस्टहून मुंबईत पोहोचले.


१ मार्च : आठवे विमान २१६ भारतीयांना घेऊन बुडापेस्टहून नवी दिल्लीत पोहोचले.


१ मार्च : २१८ भारतीयांना घेऊन नववं विमान बुखारेस्टहून नवी दिल्लीत पोहोचले.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number