बहुप्रतिक्षीत गोसीखुर्द प्रकल्प डिसेंबर 2020पर्यंत पुर्ण करणार- मुख्यमंत्र्यांच्या विशेष बैठकीत निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्याचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेला गोसीखुर्द प्रकल्प अद्यापही रखडलेल्याच स्थितीत आहे. तो पूर्ण करण्याकरता राज्य सरकारने आता डिसेंबर 2020पर्यंत मुदत वाढ दिली असून त्यासाठी आणखी 9 हजार 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.   मुख्यमंत्री, तसेच खासदार नाना पटोले आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत […]

बहुप्रतिक्षीत गोसीखुर्द प्रकल्प डिसेंबर 2020पर्यंत पुर्ण करणार- मुख्यमंत्र्यांच्या विशेष बैठकीत निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्याचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेला गोसीखुर्द प्रकल्प अद्यापही रखडलेल्याच स्थितीत आहे. तो पूर्ण करण्याकरता राज्य सरकारने आता डिसेंबर 2020पर्यंत मुदत वाढ दिली असून त्यासाठी आणखी 9 हजार 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 

मुख्यमंत्री, तसेच खासदार नाना पटोले आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत गोसीखुर्दसाठी 9 हजार कोटी रुपये खर्च झाले असून 29 वर्षांनंतरही प्रकल्प अपूर्णावस्थेतच आहे.

 

सुरुवातीला 460 कोटी रुपये खर्च असलेल्या प्रकल्पाचा आकडा 18 हजार 500 कोटींवर गेल्याने राजकीय अनिच्छेमुळे प्रकल्पाची किंमत 15 पट वाढली असून अवघ्या शेकडो कोटींच्या प्रकल्पाने पाच आकडी मजल मारल्याने आता हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत एकूण रक्कम लाखो कोटींवर तर पोहोचणार नाहीना अशी शंका मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number