नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसची भर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे.

नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसची भर

नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. प्रवाश्याची गर्दी वाढली असताना या गाड्या आल्याने एसटीच्या तिजोरीत चांगली भर पडण्याची शक्यता आहे. या 20 बसेसमधून 10 गाड्या गणेशपेठ बस आगाराला,5 इमामवाडा आणि 5 रामटेक आगाराला मिळाल्या आहेत.

हेही वाचा : एप्रिलमध्ये चौथ्यांदा कमाल तापमान 42 अंशांवर; वाढत्या तापमानाचा उद्योग-व्यापारावर परिणाम

नागपूर विभागात 8 डेपो असून सद्यस्थितीत या आगारातून एकूण 415 बसेसचे संचलन होते. यातील अनेक बसेस जुन्या आहेत. सध्या लग्नसराईची धूम असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. म्हणून नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 20 नवीन बसेसची सोय केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number