पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनाच्या लालसेपोटी एका चिमुरड्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये गुप्त धन काढण्याकरिता 2 वर्षीय ‘युग मेश्राम याचा बळी देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
गेल्या 8 दिवसांपासून ‘युग मेश्राम’ हा 2 वर्षीय चिमुरडा बेपत्ता झाला होता. पोलीस विभाग युगचा शोध घेत होता. अखेर बेपत्ता युग मेश्रामचं शव त्याच्या घरासमोरच्याच तंसाच्या ढिगाऱ्यात सापडलं. युगची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता जाणवताच पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. गुप्तधनाच्या मिळवण्याच्या अंधश्रद्धेतून लहानग्या युगचा बळी दिला गेल्याची माहिती तपासात उघड झाली.
गुप्तधन काढणाऱ्यांपैकी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद बनकर व सुनील बनकर अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग होता, याची पोलीस चौकशी करत आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडारा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.