जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीमधील दुसऱ्या मजल्यावरून पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
रुद्रांक अमोल मंजाळ या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. घटना काळेवाडी येथील तापकीर नगर येथे घडलीय.
दुपारी दोनच्या सुमारास रुद्रांक एकटा बबाई निवास या राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. खेळत असताना त्याचा अचानक तोल जाऊन तो खाली पडला.
त्याला त्वरित उपचारासाठी पिंपरी येथील वाय सी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलेय.
अचानक झालेल्या या घटनेने नवं वर्षच्या सुरवातीला मुंजाळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्या समोर आलयं.