पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद, मावळमधील पर्यटकानं NIA ला दिली माहिती

रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं  कैद झालं आहे.

पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद, मावळमधील पर्यटकानं NIA ला दिली माहिती

मावळ: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो आले. देहूरोडमधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते.

 पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. मात्र बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत मुलीचं रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं कैद झालं आहे. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती NIA ला दिली असून या व्हिडिओ आणि फ़ोटोची संपूर्ण तपासणी ही NIA कडून केली जात आहे. 

नेमकं काय घडलं? 
जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेने नटलेले पहलगाम आता एका भयावह घटनेमुळे चर्चेत आले आहे. 22 एप्रिलला अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करण्या आधी धर्म विचारला गेला होता असं समोर आलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number