जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर
बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या एका मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीला भरदिवसा तीन नराधमांनी डोंगरावर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित मुलीने जेव्हा या बाबतची तक्रार पोलीसांत दाखल केल्यावर या प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलीसांनी तात्काळ अटक केली. रविंद्र सांजेकर अहमद खान (रा. शिरगाव) असे अटक आरोपींची नावे आहेत तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.
दरम्यान, पीडित मुलीच्या जबानीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून रविंद्र सांजेकर, अहमद खान यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. काल (बुधवारी) आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.