जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे वजन तब्बल पाच किलो आणि उंची दोन फूट आहे, असे तुम्हाला सांगितले तर कदाचित पटणार नाही. पण हे खरे आहे. हा चमत्कार घडलाय तो कोल्हापुरातल्या रांगड्या मातीत.
राजारामपुरीतील जननी रुग्णालयात हे बाळ जन्माला आले. महत्वाचं म्हणजे बाळाची आई स्वाती राहुल किणीकर या निरोगी असून त्यांचे दिवस पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिक प्रसूती झाली.
बाळाचे वजन आणि उंची तपासल्यानंतर जननी हॉस्पिटलमधील डॉ. सरोज शिंदे यांच्यासह स्टाफने आश्चर्य व्यक्त केलंय. वजन आणि उंची या दोन्हीच्या बाबतीत हा राज्यातील विक्रम असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितलंय.