जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
1993च्या मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी विशेष टाडा कोर्टात शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरु आहे. दरम्यान दोषी ताहेर मर्चंट आणि करीममुल्ला खान यांची साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात नेमकी काय भूमिका होती हे विषेश सरकारी वकील दीपक साळवी यांनी कोर्टापुढे मांडलं.
ताहेर मर्चंट हा बॉम्बस्फोटांसाठी टायगर मेमन इतकाच जबाबदार आहे असंही दीपक साळवी यांनी म्हटलं. त्याचबरोबर करीमुल्ला खान हा सुद्दा तितकाच दोषी असल्यामुळे दोघांनाही फाशी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिल दीपक साळवी यांनी केली.