जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी केस बी म्हणजे 93 बॉम्बस्फोटातील शेवटच्या खटल्यातील सात आरोपी दोषी आहेत की नाही, याबाबत विशेष टाडा न्यायालाय 16 जूनला निकाल देणार आहे.
12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
1993 सालचं साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा कोर्ट 16 जूनला निकाल देणार आहे. अबू सालेम, मुस्तफा डोसाबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे.