जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
न्यायालयानं उंचीचे निर्देश न दिल्यानं दहीहंडी पथकानं थरांची उंची गाठली. त्यामुळे आयोजन घटूनही जखमी गोविंदांची संख्या वाढली.
मुंबईत एकूण 192 गोविंदा जखमी झाले. तर पालघर आणि नवी मुंबईत 2 गोविंदाचा मृत्यू झाला. दहींहडीत किती थर रचावेत, याबाबत न्यायालयानं यंदा निर्देश दिले नाहीत.
मात्र, दहीहंडी समन्वय समितीनं शून्य अपघाताचं ध्येय बाळगलं. तरी जखमींची संख्या वाढली. आयोजकांनी हारनेस्ट लावण्याचे आदेश न पाळल्याचं दिसून आलं.
त्यामुळे भविष्यात हा उत्सव पुन्हा एकदा न्यायालयाच्या चौकटीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.