घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू; नर्सिंग होमच्या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा आरोपाखाली शिवसैनिक सुनील शितपला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईताल इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसैनिक सुनील शितपला अटक करण्यात आली आहे.    घाटकोपरमध्ये इमारत कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी शिवसैनिक सुनिल शितप याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहचला आहे.    शिवसैनिक सुनिल शितप यांच्या नर्सिंग होमच्या कामामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप […]

घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू; नर्सिंग होमच्या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा आरोपाखाली शिवसैनिक सुनील शितपला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईताल इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसैनिक सुनील शितपला अटक करण्यात आली आहे. 

 

घाटकोपरमध्ये इमारत कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी शिवसैनिक सुनिल शितप याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहचला आहे. 

 

शिवसैनिक सुनिल शितप यांच्या नर्सिंग होमच्या कामामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तळमजल्यावर शितप याचं नर्सिंग होम होतं.

 

तर, वरच्या मजल्यावर रहिवासी राहत होते. शितप नर्सिंग होममध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरु होते. तळमजल्यावरचे पीलर तोडून हॉस्पिटल वाढवलं असल्याचा आरोप

शितपवर आहे.

 

पीलर तोडल्यानेच इमारतीला धोका निर्माण झाला होता असं इथले स्थानिक आता सांगतायत. निवासी इमारतीमध्ये हे नर्सिंग होम कसं. आणि नुतनीकरणाआधी

परवानगी घेतली होती का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number