Palghar Crime : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, बेकायदा गर्भपाताचेही प्रकरण उघडकीस; आरोपीला अटक
पालघर : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी देविदास ठाकरे याच्याविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेचा एका खासगी रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात झाल्याचाही आरोप असून, संबंधित डॉक्टरची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांची […]
पालघर : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी देविदास ठाकरे याच्याविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेचा एका खासगी रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात झाल्याचाही आरोप असून, संबंधित डॉक्टरची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांची संमती न घेता गर्भपात केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात संबंधित डॉक्टरवरही कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : Crime News: 'आई, मला माफ कर…'; लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यांत नवविवाहित शिक्षिकेने उचललं टोकाचं पाऊल, भावनिक व्हिडीओ शेअर करून मांडली व्यथा