वीज पडून १६ मेंढ्यांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी विजांच्या कडकडांसह हा पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी विजा पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. बुलढाणा तालुक्यातील साखळी गावात वीज पडून तब्बल १६ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये या मेंढी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे. […]

वीज पडून १६ मेंढ्यांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी विजांच्या कडकडांसह हा पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी विजा पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. बुलढाणा तालुक्यातील साखळी गावात वीज पडून तब्बल १६ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये या मेंढी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे. वीज पडल्याने साखळी शिवारात तब्बल १६ मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्याने या शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तात्काळ कृषी विभागांना या संपूर्ण नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी भाबडी आशा शेतकरी आता व्यक्त करू लागला आहे.

हवामान खात्याने ५ मार्च ते ८ मार्च या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडात होऊन अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मागील दोन दिवसात जिल्ह्यात बुलढाणा शहराच्या जवळच्या परिसरात आणि इतर तालुक्यात पावसाची नोंद झाली. वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येत आहे. सकाळी सूर्याचे दर्शन होत नाही, अशी स्थिती आहे. वातावरणामध्ये देखील गारवा निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.

एकंदरीत ज्या होळीच्या सणाच्या पूर्वीच उन्हाची चाहूल लागण्यास सुरुवात होते त्याचवेळी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजय बोराडे या मेंढपाळाच्या १६ मेंढ्या दगावल्या आहेत. विजय बोराडे यांनी त्यांचं पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number