महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार; शवविच्छेदन अहवाल उघड

  विजयसिंह बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आणला आहे. या अहवालातून महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याचे उघड झाले आहे. महादेव मुंडे यांच्या शरीरावर 16 प्राणघातक वार करण्यात आले. गळा कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता.  त्यानंतर […]

महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार; शवविच्छेदन अहवाल उघड

 

विजयसिंह बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आणला आहे. या अहवालातून महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याचे उघड झाले आहे. महादेव मुंडे यांच्या शरीरावर 16 प्राणघातक वार करण्यात आले. गळा कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता.  त्यानंतर 22 ऑक्टोबरला उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेला एकवीस महिने उलटले आहेत.  सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी हा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक केला आहे. महादेव मुंडे यांना 20 सेंमी लांब आणि 8 सेंमी रुंद हत्याराने गळा कापला. मारहाणीमुळे शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. श्वसननिलका कापली गेली आणि रक्तवाहिन्या तुटल्या. 20 सेंमी लांब, 8 सेंमी रुंद हत्याराने महादेव मुंडेंच्या गळा कापला. या दरम्यान त्यांच्या मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झाला.  महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार करण्यात आले आणि त्यांची निघृण हत्या केली. या प्रकरणातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number