डोंबिवलीतील १५६ कारखान्यांची होणार हकालपट्टी

सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढू; कामा संघटनेचा पवित्रा राज्य सरकारने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. मात्र, कामा संघटनेने राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबत कामा संघटनेला काहीही माहिती नव्हती. तसेच यासंदर्भातील अधिकृत पत्रसुद्धा संघटनेला […]

डोंबिवलीतील १५६ कारखान्यांची होणार हकालपट्टी

सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढू; कामा संघटनेचा पवित्रा

राज्य सरकारने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. मात्र, कामा संघटनेने राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबत कामा संघटनेला काहीही माहिती नव्हती. तसेच यासंदर्भातील अधिकृत पत्रसुद्धा संघटनेला देण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत कंपन्या स्थलांतरित करणार नाही, असा पवित्रा कामा संघटनेने घेतला आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात कायदेशीर लढणार असल्याचे कामा संघटनेने सांगितले आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि उद्योग विभागाने डोंबिवली औद्योगिक क्षेत्राची पाहिणी केली असता, तेथील १५६ कारखाने रासायनिक, धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डोंबिवलीतील हे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे. तसेच रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रहिवासी भागांपासून ५० मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number