नववीतल्या आकाशचा ‘राम’नामाचा ‘असा’ विक्रम, गिनिज बुकात नोंद

प्रत्येकाला काही ना काही करण्याचा एक वेगळा छंद असतो. हा छंद मनापासून जोपासल्यास आपल्या छंदामुळे नवीन ओळख निर्माण होते. भोसरीच्या दिघी येथे राहणारा पंधरा वर्षांच्या आकाश बजदने याने आपल्या छंदातून विक्रम नोंदवण्याची किमया साधली आहे. आपल्या छंदातून तांदळाच्या लाखो दाण्यांवर ‘राम’नाम लिहिण्याचा अद्भूत विक्रम पिंपरी-चिंचवडच्या आकाशने केला आहे. दुर्बिणी शिवाय वेगवेगळ्या रंगांमध्ये लिहिण्याची कला अवगत […]

नववीतल्या आकाशचा ‘राम’नामाचा ‘असा’ विक्रम, गिनिज बुकात नोंद

प्रत्येकाला काही ना काही करण्याचा एक वेगळा छंद असतो. हा छंद मनापासून जोपासल्यास आपल्या छंदामुळे नवीन ओळख निर्माण होते. भोसरीच्या दिघी येथे राहणारा पंधरा वर्षांच्या आकाश बजदने याने आपल्या छंदातून विक्रम नोंदवण्याची किमया साधली आहे. आपल्या छंदातून तांदळाच्या लाखो दाण्यांवर ‘राम’नाम लिहिण्याचा अद्भूत विक्रम पिंपरी-चिंचवडच्या आकाशने केला आहे. दुर्बिणी शिवाय वेगवेगळ्या रंगांमध्ये लिहिण्याची कला अवगत केल्याने आकाशच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

दुर्बिणीशिवाय तांदळावर विविध रंगांमध्ये रामनाम कसं लिहावं, याचं मार्गदर्शन आकाशला वडिलांनी केलं.

इयत्ता नववीत शिकत असणारा आकाश शाळेतून रोज घरी आल्यावर आणि शाळेचा अभ्यास संपल्यानंतर बारा रंगांमध्ये राम तांदळाच्या दाण्यावर लिहित असे. दोन ते अडीच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर या मेहनती विद्यार्थ्याने तांदळाच्या तब्बल दीड लाख दाण्यांवर ‘राम’नाम लिहित नवीन विक्रम केला आहे.

या विक्रमानंतर आता तांदळाच्या दाण्यांवर ‘वंदे मातरम’ किंवा ‘राष्ट्रगीत’ लिहिण्याचा आकाशचा मानस आहे. या कामगिरीने आज आकाशचं नाव जागतिक स्थरावर जाऊन गिनिज बुकात नोंद झाली आहे.

आकाशने नावाप्रमाणे उंच भरारी घेत ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केल्याने शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याचा सार्थ अभिमान आहे, यात काही शंका नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number