जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर हल्ला झाल्याची घटना घडलीय. 14 वर्षीय मुलीवर एका माथेफिरुने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी आपल्या आईसोबत शाळेला जात असतांना सब-बेत या माथेफिरुने मुलीवर सपासप वार केले. मुलीवर 5 ते 6 वेळा वार करुन हा माथेफिरु पसार झाला. विनोद कुमार असे या हल्लेखोराचे नाव आहे.
दरम्यान, जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.