जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतक-यांना सुखद दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने 2008-09 वित्त वर्षात किमान आधारभूत किमतीत 155 रुपयांची घसघशीत वाढ केली होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा संपुआ सरकारला फायदा झाला होता.