देशभरातील 14 भोंदूबाबांची यादी जाहीर; आसाराम, राम रहिमसह राधे माँ यांचा समावेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   देशातील भोंदूबाबांविरोधात आखाडा परिषदेने मोठी घोषणा केली आहे. परिषदेने देशभरातील 14 स्वयंघोषित बाबांची यादी जाहीर करत ते भोंदु असल्याचं सांगितले.    उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले.   आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या 14 […]

देशभरातील 14 भोंदूबाबांची यादी जाहीर; आसाराम, राम रहिमसह राधे माँ यांचा समावेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशातील भोंदूबाबांविरोधात आखाडा परिषदेने मोठी घोषणा केली आहे. परिषदेने देशभरातील 14 स्वयंघोषित बाबांची यादी जाहीर करत ते भोंदु असल्याचं सांगितले. 

 

उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले.

 

आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या 14 भोंदूबाबांच्या यादीत बाबा गुरमीत राम रहिम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सचिदानंत गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमुर्ती द्विवेदी, स्वामी आसीमानंद ऊर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number