जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नगरच्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला 13 जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे.
त्यानिमित्त 13 जुलैला मुंबईत कँडलमार्च काढला जाणार आहे.
नगरमध्ये अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर राज्यभर मराठा क्रांतीनं मूक मोर्चा काढला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे.
त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत कँडलमार्च काढून श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.