बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात

मंगळवारपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात ३१९५ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २१,३९६ कर्मचारी कार्यरत आहेत. २७१ भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी […]

बारावीच्या लेखी परीक्षेला सुरूवात

मंगळवारपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात ३१९५ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २१,३९६ कर्मचारी कार्यरत आहेत. २७१ भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू झाली असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायाला सांगितलं होत. तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रा जवळील १०० मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. १००% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी झाडाझडती घेतली जाणार शिवाय चित्रीकरणही केलं जाणार आहे.

प्रश्नपत्रिका ची गोपनीयता आबाधीत ठेवण्यासाठी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन येणारे परिरक्षक यांनी आपली जीपीएस परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सुरू ठेवणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात २५ प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट असेल हे पाकीट उघडताना त्यावर वर्गातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाईल त्यानंतर पर्यवेक्षक स्वाक्षरी करून सीलबंद पाकिटातील प्रश्नपत्रिका वितरित केली जातील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number