बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, गुरुवारी (दि. २५ मे) बारावीचा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी २ वाजता लागणार असून निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
अन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यावर राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होईल, अशी माहिती सांगितली जात होती. मात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने २५ मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे.