बारावी परीक्षेच्या हस्ताक्षर घोटाळा

बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहे. एकाचवेळी ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर समोर आले होते. आता या प्रकरणात चौकशीअंती राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे दोन शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बोर्डाच्या चौकशीनंतर […]

बारावी परीक्षेच्या हस्ताक्षर घोटाळा

बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहे. एकाचवेळी ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर समोर आले होते. आता या प्रकरणात चौकशीअंती राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे दोन शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बोर्डाच्या चौकशीनंतर आता पोलिसांकडून देखील ३७२ विद्यार्थ्यांचा जबाब घेतला जाणार आहे.

३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. यासाठी बोर्डाने चौकशी समिती नेमली होती. ज्यात विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पेपर तपासणाऱ्या दोन शिक्षकांवर सोयगावच्या फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ते दोघेही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.

दरम्यान या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर ते हस्ताक्षर नेमकं कोणाचे हे देखील अधिकृत स्पष्ट होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता पोलिसांकडून संबंधित ३७२ विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून जबाब नोंदवला जाणार आहे. या प्रकरणाचा खुलासा लवकरच होईल अशी आशा आता विद्यार्थ्यांनमध्ये आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number