252 पथकांची नियुक्ती करूणही, पेपरच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर पहिल्या पेपरचा एक तास पूर्ण होत असेल नसेल तो पेपर फुटल्याच समोर आलं आहे. तशी प्रश्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेतूनही प्रश्नपत्रिका लीक झाल्याच समोर आलं आहे. तांबेवाडीच्या आश्रमशाळेत काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी […]

252 पथकांची नियुक्ती करूणही, पेपरच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर पहिल्या पेपरचा एक तास पूर्ण होत असेल नसेल तो पेपर फुटल्याच समोर आलं आहे. तशी प्रश्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेतूनही प्रश्नपत्रिका लीक झाल्याच समोर आलं आहे.

तांबेवाडीच्या आश्रमशाळेत काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा अद्यापही झालेला नाही.

solapur-paper.jpg

इंग्रजी विळयाच्या सेक्शनए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली असतानाही पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका लीक कशी झाली हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहीला आहे.

 

 

 3721bc8a-f16c-4a70-978c-27bc28f6f31c.jpg

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number