वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चीनला थेट ब्रिटनशी जोडणारी पहिली मालवाहू रेल्वेगाडी 12 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी चीनच्या यिवु शहरात येऊन पोहोचली.
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लांबीच्या रेल्वे मार्गावरील ही गाडी व्हिस्की आणि लहान मुलांसाठीचे दूध वाहून नेते.
ही गाडी चिनी प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी 9.30 वाजता यिवुला पोहोचली, असे यिवु तिआनमेंग इंडस्ट्री कंपनीने सांगितले.
औषधे आणि यंत्रसामग्रीदेखील वाहून नेणारी ही गाडी 10 एप्रिलला लंडनहून निघाली असून, तिने आतापर्यंत फ्रान्स, बेल्जिअम, जर्मनी, पोलंड, बेलारुस, रशिया, कझाकस्तानमधून प्रवास
केला.
हा नवा रेल्वे मार्ग रशियातील प्रसिद्ध ट्रान्स- सायबेरियन रेल्वेपेक्षा लांब असला, तरी साली सुरू झालेल्या आणि सध्या विक्रमी असलेल्या चीन- माद्रिद मार्गापेक्षा सुमारे 1 हजार
किलोमीटरने कमी आहे.