Wardha Crime : वर्धा हादरलं! 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या, शेतातील घरात कपडे फेकले; शाळेतून घरी परतल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेली अन्…

वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Wardha Crime : वर्धा हादरलं! 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या, शेतातील घरात कपडे फेकले; शाळेतून घरी परतल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेली अन्…

वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेली असता तिची हत्या करण्यात आली. यावेळी मुलीचे कपडे कुटाराच्या रूममध्ये फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,स्थानिक गुन्हे शाखा, सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर सावंगी (मेघे) पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोठा गावापासून मुलीचा शेतामध्ये त्याचाच घरामध्ये मृतदेह मिळाला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपास सुरू केला. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा- Pune Crime: पुणे हादरले! नववीतील विद्यार्थिनीवर रोबोटिक्स शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; नराधम आरिफ सय्यदला अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचा तपास एचडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. तसेच फॉरेन टीम आणि सायबर पथकांकडून काही माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपविभागीय ते 14 पथक तयार करण्यात आलेल्या तांत्रिक विभागातील दोन पथक तयार करण्यात आलेले आहे. तपासामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यावर काम सुरू आहे. त्या माहितीवरून काही लोकांची चौकशी सुरू असून लवकरात लवकर आरोपी पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान याप्रकरणी पाच संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची देखील चौकशी सुरु आहे. पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यावेळी आरोपीला अटक करून फाशी देण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार देण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाजवळ नातेवाईकांच्या घोषणा सुरु असून समाजबांधवांनी एकत्रित येत आंदोलन सुरू केल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number