वृत्तसंस्था, मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा येत्या 24 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यातील 17 ते 18 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदा अभ्यासक्रम जुनाच असल्यामुळे नियमित अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका निघणार आहेत.