11th Admission 2026: विद्यार्थ्यांनो तयार व्हा! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मेपासून सुरुवात

अकरावी प्रवेशाबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. 

11th Admission 2026: विद्यार्थ्यांनो तयार व्हा! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मेपासून सुरुवात

काल महाराष्ट्राचा SSC बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे मुलीही यावेळी अव्वल आल्या आहेत. अशातच आता अकरावी प्रवेशाबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 11 मेपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून पहिली नियमित प्रवेश फेरी 21 ते ३० मे दरम्यान पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना भाग-1 आणि भाग-2  भरून किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येणार आहेत.

23 ते 26 मे दरम्यान प्रवेश अलॉटमेंट जाहीर होईल, तर 26 ते 28 मेदरम्यान कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चिती प्रक्रिया होणार आहे. 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number