शालेय पोषण आहारातून 114 मुलांना विषबाधा…

बीडमधल्या वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 114 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.   जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची चिमुकल्यांवर उपचार करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. शालेय पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे. शालेय पोषण आहार म्हणून […]

शालेय पोषण आहारातून 114 मुलांना विषबाधा…
बीडमधल्या वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 114 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची चिमुकल्यांवर उपचार करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. शालेय पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे.
शालेय पोषण आहार म्हणून मटकीची उसळ करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत जेवणासाठी गडबडीने ताट वाट्या घेऊन उसळ खाण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच विद्यार्थ्यांना मळ मळ होऊन उलट्या झाल्या.
 
एकापाठोपाठ अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर येऊ लागली आणि पाहता पाहता शाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची चर्चा गावभर झाली. पालकांना माहिती समजताच त्यांनी शाळेमध्ये दाखल होऊन रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी पालकांनी गर्दी केली.
हा प्रकार समजताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number