मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा छत्रपती संभाजी नगर, १० मे २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुढील दोन दिवस (शनिवार, रविवार) मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांना सतर्कतेचा […]

मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा

छत्रपती संभाजी नगर, १० मे २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुढील दोन दिवस (शनिवार, रविवार) मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मागील दोन आठवड्यापासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळेल. मात्र, अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरीक चिंतेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number