राष्ट्रपती बुधवारी प्रभू रामाचे दर्शन घेणार

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी १ मे रोजी अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. हनुमान गढी मंदिर, प्रभू रामाचे मंदिर, कुबेर टिला येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देवदर्शन घेणार आहेत. यानंतर राष्ट्रपती शरयू नदीची पूजा आणि आरती करतील. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी संध्याकाळी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराला […]

राष्ट्रपती बुधवारी प्रभू रामाचे दर्शन घेणार

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी १ मे रोजी अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. हनुमान गढी मंदिर, प्रभू रामाचे मंदिर, कुबेर टिला येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देवदर्शन घेणार आहेत. यानंतर राष्ट्रपती शरयू नदीची पूजा आणि आरती करतील.

नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी संध्याकाळी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच राम मंदिरात जाणार आहेत.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता अयोध्येत पोहोचतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number