सांगलीत शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक

मुंबई , २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून गाडीवर शाई फेकण्यात आली तसेच चपलांचा हार देखील घालण्यात आला. या घटनेनंतर यामागे नामक हुणांचा हात असेल असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकाश शेंडगे यांच्या गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चपलांचा हार घालण्यात आलेला […]

सांगलीत शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक

मुंबई , २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून गाडीवर शाई फेकण्यात आली तसेच चपलांचा हार देखील घालण्यात आला. या घटनेनंतर यामागे नामक हुणांचा हात असेल असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चपलांचा हार घालण्यात आलेला आहे. तर याशिवाय गाडीच्या समोरच्या काचेवर एक धमकीचे पत्रही चिटकवण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय.

शेंडगेंकडून चौकशीची मागणी
हॉटेल ग्रेट मराठासमोर शेंडगे यांची कार उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला. कारच्या काचेवर धमकी वजा इशारा देखील देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पत्रात नेमके काय?
शेंडगे यांच्या काचेवर लावण्यात आलेल्या पात्रातून त्यांना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये ”प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू घे वेड्या. धनगर आणि मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढीलवेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा” अशी धमकी देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number