मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर कात टाकणार असून, नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. अकादमीच्या प्रांगणातील पुलंच्या पुतळ्याची जागा बदलण्यात येणार असून, ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे बरेचसे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा अकादमीच्या व्यवस्थापनाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून एप्रिल-मे हे दोन्ही महिने खूप महत्त्वाचे आहेत. सध्या ५० ते ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.