उमेदवाराकडील संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे पाहा ॲपवर

छत्रपती संभाजीनगर, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराकडे संपत्ती किती? उमेदवारांवर काही गुन्हे दाखल आहेत का? याची सर्व माहिती मतदारांना सी-व्हिजिल ॲपवर उपलब्ध होईल. ‘नो युवर कैंडिडेट’ या पर्यायात ही माहिती दिसेल. ‘सी-व्हिजिल’वर महिनाभरात १६३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १४३ तक्रारींचे तासाभरातच निराकरण करण्यात आले, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे सहा. नोडल अधिकारी […]

उमेदवाराकडील संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे पाहा ॲपवर

छत्रपती संभाजीनगर, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराकडे संपत्ती किती? उमेदवारांवर काही गुन्हे दाखल आहेत का? याची सर्व माहिती मतदारांना सी-व्हिजिल ॲपवर उपलब्ध होईल. ‘नो युवर कैंडिडेट’ या पर्यायात ही माहिती दिसेल. ‘सी-व्हिजिल’वर महिनाभरात १६३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १४३ तक्रारींचे तासाभरातच निराकरण करण्यात आले, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे सहा. नोडल अधिकारी किशोर घोडके यांनी दिली.

उमेदवारांसाठी एन्कोर ॲप

एन्कोर ॲपद्वारे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुविधा दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आलेले उमेदवारी अर्ज स्वीकृत, अस्वीकृत करणे, झालेल्या मतदानाची माहिती संकलित करणे इत्यादी कामे या ॲपमार्फत केली जाणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number