नागपूर, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. उन्हानं शरीराची काहिली होत असली तरी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४४.१२ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
रामटेक – ४०.१० टक्के
नागपूर – ३८.४३ टक्के
भंडारा – गोंदिया – ४५.८८ टक्के
गडचिरोली – चिमूर – ५५.७९ टक्के
चंद्रपूर – ४३.४८ टक्के
एकूण – ४४.१२ टक्के
अशी आहे लढत
रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित
