मतदान करा, आकर्षक बक्षिसे जिंका

चंद्रपूर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि अधिकाधिक संख्येने मतदान करावे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. मतदाराने […]

मतदान करा, आकर्षक बक्षिसे जिंका

चंद्रपूर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि अधिकाधिक संख्येने मतदान करावे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर येऊन सेल्फी काढून तो स्पर्धेसाठी तयार केलेल्या लिंकवर अपलोड करायचा आहे. भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

मतदारांनी १९ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/ तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पहिल्या तीन क्रमांकाचे आकर्षक बक्षीसे : प्रथम बक्षीस 1 लक्ष 60 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची आरटीआर – 140, 4 व्ही बाईक, (आरटीओ आणि विमा खर्च समाविष्ट). सद्यस्थितीत विसापूर येथील श्रध्देय श्री. अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये ही बाइक प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षीसांमध्ये 91 मिराकी ई-सायकल ( किंमत 35 हजार) आणि सॅमसंग ॲन्ड्राईड फोन (किंमत 20 हजार )

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number