नवी दिल्ली , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सोमवार 8 एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावास्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची जरूरी नाही. हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील विविध राज्यातून दिसणार आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. गुढीपाडवा आहे. त्यादिवशी शालिवाहन शके 1946 चा प्रारंभ होत आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही.
आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून ते पहाटे २ वाजेपर्यंत चालणार आहे. ग्रहणाची वेळ रात्री असल्यामुळे भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही.