Homeक्राईम पुणे जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांत दीड लाख नवमतदारांची भर
पुणे जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांत दीड लाख नवमतदारांची भर
पुणे, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांमध्ये दीड लाख नवमतदारांची भर पडली आहे. मतदार नाव नोंदणीसाठी अद्याप १५ एप्रिलपर्यंत मुदत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहर आणि जिल्ह्यात वाढलेले नवमतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणारे ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ८३ लाख […]
पुणे, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांमध्ये दीड लाख नवमतदारांची भर पडली आहे. मतदार नाव नोंदणीसाठी अद्याप १५ एप्रिलपर्यंत मुदत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहर आणि जिल्ह्यात वाढलेले नवमतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणारे ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ८३ लाख ७८ हजार ६६४ इतकी झाली आहे.