लेह, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लडाखमधील लेह जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी ७ एप्रिलपर्यंत असेल. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
साामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाख प्रांतात सुरू असलेल्या विकास कामांना विरोध करण्यासाठी २१ दिवस उपोषण केले. या उपोषणाला सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर उपोषण थांबवून वांगचुक यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चाच्या निमित्ताने लेह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
लडाखमध्ये वाहतुकीसाठी रस्ते निर्मितीची कामं वेगाने सुरू आहेत. लेहमधून जाणाऱ्या एका रस्त्याने थेट भारत – चीन सीमेवर पोहोचणे सोपे होणार आहे. लष्करी कामांसाठी तसेच सामान्यांच्या सोयीसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. पण पर्यावरणाचे कारण पुढे करत वांगचुक यांनी रस्त्याला विरोध केला आहे. पर्यावरण विभागाने रस्त्याला परवानगी दिली आहे. पण वांगचुक यांचा रस्त्याला विरोध आहे.