बाबा सिद्दीकीची इफ्तारी २०२४ मध्ये होणार या खास गोष्टी !

बाबा सिद्दीकी इफ्तार डिनर पार्टी ही नेहमीच चर्चेत असते. रमजानच्याच्या महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या इफ्तार पार्टीला बॉलीवूड सेलेब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती लाभते. आता मधली भव्य दिव्य होणारी बाबा सिद्दीकी इफ्तार डिनर पार्टी अगदीच जवळ आली असून या वर्षी काय नवीन घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या ३५ वर्षा पासूनची ही अनोखी […]

बाबा सिद्दीकीची इफ्तारी २०२४ मध्ये होणार या खास गोष्टी !

बाबा सिद्दीकी इफ्तार डिनर पार्टी ही नेहमीच चर्चेत असते. रमजानच्याच्या महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या इफ्तार पार्टीला बॉलीवूड सेलेब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती लाभते. आता मधली भव्य दिव्य होणारी बाबा सिद्दीकी इफ्तार डिनर पार्टी अगदीच जवळ आली असून या वर्षी काय नवीन घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या ३५ वर्षा पासूनची ही अनोखी परंपरा १९८९ मध्ये ‘ईद मिलन’ नंतर सुरू झाली. जिथे श्री. सिद्दिक यांनी समविचारी होऊन धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्र घेऊन येऊन या इफ्तारी डिनर ची सुरुवात केली. सगळेच या इफ्तार डिनर परंपरेची झलक पाहण्याची वाट पाहत असताना यंदाची इफ्तार लवकरच होणार आहे. ज्यात अनेक बड्या कलाकारांची झलक अनुभवयाला मिळणार आहे.

पुन्हा एकदा २४ मार्च २०२४ रोजी मुंबईतील ताज लँड्स एन्ड येथे यंदाची इफ्तार पार्टी पार पडणार असून तारे तारकांच्या उपस्थितीत ही खास रात्र अजून अविस्मरणीय होणार आहे. या वर्षीचा कार्यक्रम देखील नेत्रदीपक सोहळा होणार यात शंका नाही.

सलमान खानने मागच्या वर्षी स्वतःच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सलमान खान आणि शाहरुख खान व्यतिरिक्त, संजय दत्त, सुनील शेट्टी, अनिल कपूर, इमरान हाश्मी, कतरिना कैफ, उर्मिला मातोंडकर, कपिल शर्मा, भारती सिंग, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, शहनाज गिल, अंकिता लोखंडे, यांसारखे आयकॉन आणि मेगास्टार यांनी मागच्या वर्षी इफ्तार पार्टीत येऊन या कार्यक्रमाची सांगता केली.

२०२४ ची इफ्तार डिनर पार्टी केवळ एका दिवसासाठी एक सेलिब्रेशन नसून अनेकांना आठवणींचा उजाळा देऊन जाणार आहे. इफ्तारचे खरे महत्त्व हे आहे की मित्र, कुटुंब आणि विविध क्षेत्रातील विविध व्यक्ती आपली संस्कृती, परंपरा आणि आनंद एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी एकत्र येतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number