होळी सणानिमित्त खास उपक्रम

सोलापूर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेतर्फे खास होळी सणानिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन खास पुणे येथील महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी फडकुले सभागृहात केले. भारतात हजारो लाखो लोक गरिबीमुळे उपाशीपोटी जगत असताना या होळीत आपण पुरणपोळी […]

होळी सणानिमित्त खास उपक्रम

सोलापूर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेतर्फे खास होळी सणानिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन खास पुणे येथील महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी फडकुले सभागृहात केले. भारतात हजारो लाखो लोक गरिबीमुळे उपाशीपोटी जगत असताना या होळीत आपण पुरणपोळी नैवेद्य म्हणून जाळून खाक करण्यापेक्षा गरिबांना दान करणे जास्त हितकारक आहे, असे मिलिंद देशमुख यांनी सांगितले. सोलापूर शहरात एकूण तीन ठिकाणी पोळी संकलन केंद्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. या केंद्रात लोकांनी पुरणपोळी दान करावी. होळी करा लहान पोळी करा दान या उपक्रमा अंतर्गत आपण पर्यावरण पूरक वर्तन करून समाज हितकारक कार्य करूयात असे मत शहर शाखा कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number