छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र दुष्काळ जाहीर

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांत १८ मंडलात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आला. शिवाय ५० मंडलामध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. या मंडलातील गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात […]

छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र दुष्काळ जाहीर

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांत १८ मंडलात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आला. शिवाय ५० मंडलामध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. या मंडलातील गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १४ तर सोयगाव तालुक्यात ४ अशा १८ महसुली मंडळांत गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील ५० महसूल मंडलामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number