…अन् साडेसहा वर्षाच्या निर्भयाला न्याय मिळाला

मावळ , २३ मार्च २०२४ , प्रतिनिधी : साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाची अत्यंत जलदगतीने सुनावणी घेत हा निकाल दिल्याने ‘निर्भया’ला न्याय मिळाला […]

…अन् साडेसहा वर्षाच्या निर्भयाला न्याय मिळाला

मावळ , २३ मार्च २०२४ , प्रतिनिधी : साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाची अत्यंत जलदगतीने सुनावणी घेत हा निकाल दिल्याने ‘निर्भया’ला न्याय मिळाला आहे.

मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथे ही घटना घडली.तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे,तर सुजाता महिपती दळवी (वय ४८, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, ता. मावळ) असे त्याच्या आईचे नाव आहे.याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली होती.ही घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने शाळेला सुटी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गावात शोधमोहिम राबविली. दुसऱ्या दिवशी ३ ऑगस्ट दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात या मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित चोवीस तासांच्या आत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली.पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number